Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“माझ्या सिंधुदुर्गातील जनतेला त्रास नको म्हणून, मी कुटुंबीय आणि वकिलांशी चर्चा करून स्वतः “सरेंडर” झालो” – नितेश राणे 

सावंतवाडीत आमदार नितेश राणे यांनी साधला माध्यमांशी संवाद.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

सिंधुदूर्ग, दि. १० फेब्रुवारी : सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात आणलं गेलं जिल्हा रुग्णालयात सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी त्यांना सावंतवाडी येथील सिंधुदूर्ग जिल्हा कारागृहात आणले कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या नंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

नितेश राणेंना सावंतवाडी जिल्हा कारागृहातून सुटका झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्याची अतिषबाजो केली. वीस मिनिटाच्या कायदेशीर प्रक्रिया नंतर नितेश राणे सावंतवाडी कारागृहाबाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलतांना म्हणाले, मला कोणी अटक करू शकले नाही. माझ्या सिंधुदुर्गातील जनतेला त्रास नको म्हणून मी कुटुंबीय आणि वकिलांशी चर्चा करून स्वतः “सरेंडर” झालो, मुंबईत पक्षाने दिलेली जबाबदारी सांभाळणार आहे. मात्र ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी अनेकांना “ब्लड प्रेशर”चा त्रास होईल हे मात्र निश्चित विरोधकांकडून सुरु असलेले राजकारण अत्यंत खालच्या पद्धतीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

हिंगणघाट जळीतकांड निकाल : विक्की नगराळेला जन्मठेपेची शिक्षा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

११ हजार १०० रुपयांच्या बनावट नोटा बाळगल्या प्रकरणी एकास अटक

आमदार नितेश राणे यांना आज सावंतवाडी येथील कारागृहात करणार हजर

 

Comments are closed.