Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जळगावच्या पारोळामध्ये महाविकास आघाडीच्या सभेत नितेश कराळे मास्तरांनी थेट मोदींच्या शिक्षणाचा मुद्दा छेडला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

जळगावातील पारोळा इथं महाविकास आघाडीची सभा झाली. त्या  सभेत  शरद पवार यांची उपस्थिती होती. महाविकास आघाडीचे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार माजी मंत्री सतीश पाटील यांच्या प्रचार सभेत शरद पवार गटाचे प्रवक्ते नितेश कराळे यांनी जोरदार भाषण केलं. तेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणाचा मुद्दा छेडला. दाढीवाल्याचे तीन फोटो  चहा विकतानाचा, लग्नाचा आणि डिग्री घेतानाचा असे तीन फोटो भेटले तर मला  पाठवत जा. मी त्यावर रिसर्च करत आहे. मोदींनी  जी पदवी घेतली तो तर विषयच आपल्या संपूर्ण भारतामध्ये नाही. त्या पदवीवर विद्यापीठाचे स्पेलिंग सुद्धा चुकलेला आहे, असं नितेश कराळे म्हणाले.

 गद्दारंच सरकार गेलं पाहिजे, यासाठी जीवाची बाजी लावून शरद पवार हे राज्यात फिरत आहेत. शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजेच म्हणून शरद पवार साहेबांच्या रोजच्या चार ते पाच सभा होत आहे. तुमच्यासाठी साहेब हे करत आहे, तुम्ही साहेबांना साथ द्याल का?, असं कराळे गुरुजी म्हणाले. लोकांनी त्याला होकार दिला.

शरद पवार साहेबांना भ्रष्टाचाराचे सरदार म्हणतात त्या अमित शाह यांना लाज वाटत नाही का? एक  मराठीत म्हण आहे आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याच पाहावं वाकून… ज्यांना गुजरात मधून तडीपार  केले  त्यांनी आम्हाला का सांगावं, ज्यांनी छत्रपतींच्या पुतळा सुद्धा सोडला नाही महाराष्ट्राची अस्मिता मातीत मिसळण्याचा काम या सरकारने केले आहे.  या ठिकाणाहून आपला एक आमदार केला पाहिजे आणि महाविकास आघाडीला भक्कम केला पाहिजे असं मला वाटतं, असं नितेश कराळे म्हणाले.

 लाडक्या बहिणींना 15 लाखांवरून पंधराशे रुपये वर आणले. बहिणींनी पैसे भेटले आणि जावई वावरात हिंडून राहिला. शेतकऱ्याचा कर्ज माफ करायला याच्याकडे साल्याकडे पैसे नाहीत. पंधराशे रुपयांनी महिलांचा सन्मान होत नाही. दिवाळीचा किराणा सुद्धा झाला नाही. त्यात तो केव्हाही पैसे परत मागू शकतो. आता एका घरात तीन तीन महिलांनी पैसे भरले त्यामुळे तुम्हाला नोटीस येईल दोघांपैकी एकाचे पैसे परत करा, असं म्हणत कराळेंनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलंय.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.