Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्र एक्सप्रेस झाली ‘संवाद दुत’ पाच रेल्वेगाड्यांद्वारे राज्यात जनजागृती

वर्धा येथे एक्सप्रेसचे उत्साहात स्वागत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वर्धा, दि. ११ फेब्रुवारी :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने लोककल्याणकारी योजना, उपक्रम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. याच उद्देशाने राज्यातील पाच एक्सप्रेसचे जनजागृती रथात रुपांतरण करण्यात आले असून त्यातील महाराष्ट्र एक्सप्रेस संवाद दुत बनून वर्धा स्टेशनवर आली असता तिचे मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले.

राज्य शासन सामान्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवित असते. अनेक लोककल्याणकारी उपक्रम देखील राबवितात. या योजना, उपक्रम ज्यांच्यासाठी राबविण्यात येते, त्यांना त्या माहिती झाल्या पाहिजे. त्यांनी या योजनांच्या लाभ घेण्यासाठी पुढे आले पाहिजे, यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहिम माहिती विभागामार्फत राबविण्यात येते. त्यासाठी प्रचार प्रसिध्दीचे वेगवेगळे प्रकार अवलंबिण्यात येतात.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

देशातील बहुतांश नागरीक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेगाडीलाच जनजागृती रथ बनविल्यास सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी असलेली माहिती एकाचवेळी हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकते. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन केवळ राज्यात धावणाऱ्या पाच रेल्वेगाड्या जनजागृती रथात रुपांतरीत करण्यात आल्या आहे. या संपुर्ण गाडीवर शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. त्यातील महाराष्ट्र एक्सप्रेस वर्धा स्थानकावर आल्यानंतर उपस्थित प्रवाशांकडून गाडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मंत्र्यांच्या बंगल्यांना आता किल्ल्यांची नावं – ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा…

बाल संरक्षण व मदतीबाबत काम करण्यास इच्छुक असलेल्या संस्था/व्यक्ती बाबत आवाहन

 

 

 

Comments are closed.