Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मंत्र्यांच्या बंगल्यांना आता किल्ल्यांची नावं – ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या ऐतिहासिक वारशाचे जतन व्हावे आणि त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने मंत्र्यांच्या बंगल्यांना किल्ल्याची नावे देण्याचा निर्णय झाला आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, दि. ११ फेब्रुवारी : राज्यातील दुकानांच्या पाट्या मराठीतच असाव्यात, हा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. महाविकासआघाडी सरकारने राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या ऐतिहासिक वारशाचे जतन व्हावे आणि त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने मंत्र्यांच्या बंगल्यांना किल्ल्याची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भात आदेश जारी केला आहे. त्यानुसार मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांचे नामांतर करण्यात आले आहे. त्यानुसार आदित्य ठाकरे यांच्या शासकीय बंगल्याला रायगड असे नाव देण्यात आले आहे. तर जितेंद्र आव्हाड यांचा बंगला शिवगड तर अमित देशमुख यांचा बंगला आता जंजिरा या नावाने ओळखला जाईल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मंत्र्यांच्या बंगल्यांची नावं 

  • शिवगड (जितेंद्र आव्हाड)
  • विजयदुर्ग (हसन मुश्रीफ)
  • अ ४ – राजगड (दादा भुसे) 
  • अ ५ – प्रतापगड (केसी पाडवी) 
  • अ ६ – रायगड (आदित्य ठाकरे) 
  • बी १- सिंहगड (विजय वड्डेटीवार)
  • बी २ – रत्नसिंधू (उदय सामंत)
  • बी ३ – जंजिरा (अमित देशमुख)
  • बी ४ – पावनगड (वर्षा गायकवाड)
  • बी ६ – सिद्धगड (यशोमती ठाकूर)
  • बी ७ – पन्हाळगड (सुनील केदार)
  • क १ – सुवर्णगड (गुलाबराव पाटील)
  • क २ – ब्रह्मगिरी (संदीपान भुमरे)
  • क ५ – अजिंक्यतारा (अनिल परब)
  • क ६ – प्रचितगड (बाळासाहेब पाटील)

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा…

जलवायु परिवर्तन कमी करण्यासाठी ‘सौर पुरुष’ निघाला देश-विदेशाच्या भ्रमंतीवर!

१५० किलोच्या गांजा तस्करीत आयुक्तालयातील पोलीसाला अटक 

 

Comments are closed.