Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा…

न्यायालयाचा चुकीचा निर्णय पण तरीही त्याचे स्वागत - राज्यमंत्री बच्चू कडू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अमरावती, दि. ११ फेब्रुवारी : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मध्ये २०१४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यमंत्री बचू कडू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या नामनिर्देशन पत्रामध्ये परिशिष्ट अ मध्ये मालमत्तेची माहिती सादर करणे आवश्यक असते. मात्र, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हाडाने निर्गमित केलेली मुंबई येथील सदनिकेची नोंद केली नव्हती. त्यामुळे या विरोधात चांदुर बाजार नगर परिषदेचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी बच्चू कडू विरोधात २७ डिसेंबर २०१७ रोजी चांदूरबाजार तालुक्यातील आसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.  या तक्रारीची दखल घेत तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय आखरे यांनी चौकशी करून प्रकरण न्यायालयात सादर केले होते.

यात बच्चू कडू विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते, यात तब्बल पाच वर्षानंतर चांदुरबाजार येथील न्यायालयाने बच्चू कडू यांच्या विरुद्ध निकाल देत त्यांना दोन महिने सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंड दिला आहे.  तसेच अपील करण्यासाठी 30 दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे. शिक्षा सूनावल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जामिनसाठी अर्ज सादर केला असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. या प्रकरणाने राजकीय क्षेत्रात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तर बच्चू कडू यांनी जनतेची दिशाभूल केली आणि चुकीची माहिती दिल्याने त्यांच विधानसभा सदस्यपद रद्द करा अशी प्रतिक्रिया याचिकाकर्ते गोपाल तिरमारे यांनी दिली.

न्यायालयाच्या चुकीच्या निर्णयाचे स्वागत – राज्यमंत्री बच्चू कडू

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर सदनिका आमदारांसाठी तयार करण्यात आलेल्या सोसायटीचे कर्ज काढून घेतलेली होती. निवडणूक प्रतिज्ञापत्रात कर्जाच्या रकमेचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र सदनिकेच्या घर क्रमांकाचा उल्लेख झालेला नव्हता. मात्र विरोधकांनी पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे सर्व खोटं प्रकरण उभं केलं आणि आज न्यायालयाने हा चुकीचा निकाल दिला. मात्र आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करतो तसेच आपण वरीष्ठ न्यायालयात दाद मागू आणि आम्हाला न्याय मिळेल. अशी प्रतिक्रिया आज आलेल्या निकालानंतर राज्यमंत्रीबच्चू कडू यांनी दिली.

हा संपूर्ण प्रकार अचलपूर ला घडला आणि या प्रकरणाची तक्रार चांदूर बाजार येथील व्यक्तीने आसेगाव येथील पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला एका चूकीच्या प्रकरणात दम दिला होता. त्याचाच वचपा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. खरं तर न्यायालयाने या प्रकरणात चुकीचा निर्णय दिला असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. न्यायालयाने जो काही निर्णय दिला त्याचे आम्ही स्वागत करत असलो तरी आता आम्हाला जामीन मिळाला असून वरच्या न्यायालयात आम्ही जाणार आहोत. वरच्या न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

हे देखील वाचा : 

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार…

१५० किलोच्या गांजा तस्करीत आयुक्तालयातील पोलीसाला अटक 

जलवायु परिवर्तन कमी करण्यासाठी ‘सौर पुरुष’ निघाला देश-विदेशाच्या भ्रमंतीवर!

 

 

 

Comments are closed.