Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

इस्लामिक धर्मगुरु तौकीर रजा खान यांचे पुन्हा एकदा चिथावणीखोर वक्तव्य

संपत्ती ताब्यात घेण्याची कोणाच्या बापामध्ये ताकद नाही

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

तौकीर रजा खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात त्यांनी आपली मागणी मान्य करुन घ्यायती असेल, तर सर्व मुस्लिमांनी एकजूट होऊन दिल्लीला घेराव घातला पाहिजे असं मुस्लिम धर्मगुरु आणि इत्तेहाद-ए-मिल्लत परिषदेचे प्रमुख तौकीर रजा यांनी म्हटलं आहे. इस्लामिक धर्मगुरु तौकीर रजा खान यांनी जयपूरमध्ये एक वक्तव्य केलय मुस्लिमांना रविवारी एकजूट होऊन दिल्लीला घेराव घालण्याच चिथावणीखोर वक्तव्य केलं. ‘

आमची संपत्ती जप्त करेल अशी कोणाच्या बापाची औकात नाही आमची संख्या कशाला  लपवता,  ज्यादिवशी आम्ही रस्त्यावर उतरु, त्या दिवशी तुमचा आत्मा कापेल.आम्ही आमच्या तरुणांना नियंत्रणात ठेवलं आहे. आम्ह्चे  तरुण घाबरट नाहीत. ज्या दिवशी ते  नियंत्रणाबाहेर जातील, त्यांना रोखणं तुमच्या अवाक्यातली गोष्ट नसेल असं तौकीर रजा यांनी म्हटलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

संसदेच हिवाळी सत्र सुरु होतय. जर, तुम्हाला तुमची ताकद दाखवायची असेल, तुम्हाला तुमच्या मनासारख्या गोष्टी करुन हव्या असतील तर तुम्हाला दिल्लीला यावं लागेल असं तौकीर रजा म्हणाले. ते उत्तर प्रदेशातील धर्मगुरु आहेत.  सरकार बेईमान आहे. कुरान आणि अल्लाहच अपमान करणार सरकार सत्तेवर आहे. जर, तुम्हाला त्रास होत असेल, तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्ही दिल्लीला या, माझी विनंती आहे. आपली संपत्ती ताब्यात घेण्याची कोणाच्या बापामध्ये ताकद नाही असं तौकीर रजा म्हणाले.

आम्ही आधी तिरंगा घेऊन येणार. जर ते ऐकले नाहीत तर प्रशासनाकडे जाणार. त्यानंतर जे होईल, ते  तुमची जबाबदारी असेल. आमची संख्या का लपवता? ज्या दिवशी रस्त्यावर उतरु तुमचा आत्मा कापेल” असं तौकीर रजा म्हणाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.