Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिवसेना हे नाव वापरता येईल पण ……!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. ९ ऑक्टोंबर :  एकीकडे शिवसेना हे नाव वापरता येणार नाही ही चर्चा असताना उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शिवसेना हे नाव वापरू शकतात मात्र त्यापुढे काहीतरी सुटसुटीत नाव जोडावे लागेल .

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० ऑक्टोबरला होईल, असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. मात्र, निवडणूक आयोगाने फक्त धनुष्यबाण हे चिन्हचं गोठवलं आहे, शिवसेना हे नाव कायम असणार आहे, अशी माहिती शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मात्र, निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. शिवसेना आणि एकनाथ शिंदे पक्षांना धनुष्यबाणाऐवजी मुक्त चिन्हांपैकी एखादे चिन्ह घेता येईल. शिवसेना नाव वापरता येईल परंतु, त्याला काही जोडावे लागेल, अशी माहिती शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिली.

तसंच, शिवसेना नावासमोर आता दुसरे एखादे सुटसुटीत नाव जोडावे लागणार आहे. धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय हा तात्पुरता आहे. चिन्हाबाबत अंतिम निवाडा होईपर्यंत हा निर्णय लागू हे आयोगानं म्हटलं आहे. अंतिम निवाडा कधी ते पुढील काळात ठरणार आहे, असंही नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

सुरजागड येथून खनिज वाहतूक करणाऱ्या ४० वाहनांवर कलम २८३ अंतर्गत कारवाई

आजोबाचा निशाणा चुकला गोळी लागली महिलेला

 

 

Comments are closed.