Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुख्याध्यापकाने कापले पहिलीच्या विद्यार्थ्याचे केस, ‘बॅड टच’ ही केला

अमरावतीच्या शाळेतील धक्कादायक प्रकार..  

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अमरावती, दि. २३ मार्च :  मुख्याध्यापकाने आपल्याच शाळेत पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षीय विद्यार्थ्याचे केस कातरून त्याला ‘बॅड टच’ केल्याची धक्कादायक घटना अमरावती शहरातील नामांकित दिल्ली पब्लिक स्कुल इंग्रजी शाळेत मंगळवारी उघड झाली.

याप्रकरणी संबंधित ४८ वर्षीय मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.राजापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पब्लिक स्कूल मध्ये बालकाचे केस कापल्याची घटना घडली. हा सहा वर्षीय मुुलगा त्या शाळेत पहिलीत शिकतो. सोमवारी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला. काही वेळाने मुख्याध्यापकाने त्याला कार्यालयात बोलावले. त्याचे केस व्यवस्थित असतानाही केस का वाढले म्हणून ते कात्रीने कापले व विचित्र अंगविक्षेप केले. बालकाला ‘बॅड टच’देखील केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच विद्यार्थ्यांला उन्हात बाहेर उभं करून त्याचेशी गैरवर्तनुक केली, विद्यार्थ्यांचे पालकाचे तक्रारी वरून पोलिसांनी मुख्याध्यापका विरुद्ध पोक्सो व भांदविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित पालकाच्या तक्रारीवरुन  मुख्याध्यापकाविरुद्ध पोक्सो व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविला.तर पालकाने आरोपी मुख्याध्यापकाला विचारलं असता मुख्याध्यापकाने पालकाला शिवीगाळ करून धमकी दिली असा आरोप देखील करण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

सुरक्षा वाढविताच वर्धा कोर्टात प्रवेश करणाऱ्याकडे सापडला चाकू

पोलीसांची अशीही माणुसकी

गडचिरोलीतील विशेष आहार योजनेचे यश

 

 

Comments are closed.