Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दाखल गुन्हयातील १० लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुददेमाल पोलीसांनी पिडीतांना केला परत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नालासोपारा, दि. ७ ऑक्टोंबर : तुळींज पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या विविध गुन्हयांतील आरोपीकडून जप्त करण्यात आलेले ९,००,०००/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने तसेच गहाळ झालेले १,५०,०००/- रूपये किंमतीचे २० मोबाईल हॅन्डसेट असा एकूण १०,५०,०००/- रूपये किंमतीचा मुददेमाल मिरा-भाईदर, वसई विरार पोलीस आयुक्तायलयाचे दुसऱ्या वर्धापन
दिनाचे औचित्य साधून पंकज शिरसाठ, सहा. पोलीस आयुक्त, तुळींज विभाग यांचे हस्ते फिर्यादी व पिडीत यांना परत करण्यात आला.

फिर्यादी व तक्रारदार यांच्या चोरीस गेलेल्या तसेच गहाळ झालेल्या किंमती वस्तू पोलीसांचे मार्फतीने परत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर मुद्देमाल परतीच्या कार्यक्रमाचेवेळी पंकज शिरसाठ, सहायक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र कांबळे,सपोनिरी एम. डी. म्हात्रे, पोउनिरी बी. एस. बांदल, सफौ एस. पी. सुतनासे, पोहवा ए. आर. शिंदे, ए. एस. मोरे, पो. ना यु. जे. वरठा, पो.अं. ए. एम. जमादार, व्ही. के. राऊत आय. जी. छपरीबन, पांडुरंग केंद्रे आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शिंदेंच्या नातवाविषयी केलेल्या टिकेबाबत फडणवीस व्यथित

सत्ता गेल्यावर उद्धव ठाकरेंना महागाई, हिंदुत्वाची आठवण झाली; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची टीका

Comments are closed.