Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलीस अधिकारी सचिन वाझेंना क्राईम ब्राँचमधून हटवणार – अनिल देशमुख यांची विधानपरिषदेत घोषणा

Get real time updates directly on you device, subscribe now.

उचलबांगडी नको निलंबन करून अटक करा: विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. १० मार्च: सचिन वाझेंना क्राईम ब्राँचमधून दुसऱ्या ठिकाणावर पाठवणार, असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत घोषित केले. तर, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सचिन वाझेंच्या अटकेची मागणी केली. मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी भाजपनं मंगळवारी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली होती. सचिन वाझे यांच्या मुद्यावरुन विधिमंडळात भाजप आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर, सत्ताधारी महाविकास आघाडी याप्रकरणी काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.