Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी: ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला, अकोल्याच्या पोलीस अधिकाऱ्याचा गंभीर आरोप

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे.

अधिकारी नेमणूक अकोल्यात आहेत मात्र पत्र मुंबईवरून देण्यात आले आहेत म्हणून माहितीस्तव पाठवले.


मुंबई डेस्क, दि. २६ एप्रिल: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. अकोल्याच्या पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक बी आर घाडगे या अधिकाऱ्याने पोलीस महासंचालक यांना दिलेल्या पत्रात याबाबतचे गंभीर आरोप केले आहेत.

पोलीस अधिकाऱ्याने याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनाही पत्र पाठवले आहे. संबंधित वृत्त पीटीआयच्या हवाल्याने समोर आलं आहे. दरम्यान, अकोल्याच्या पोलीस अधिकाऱ्याच्या या नव्या लेटरबॉम्बचा महाराष्ट्रातील आगामी राजकीय घडामोडींवर परिणाम होण्याची शक्यता आहे.


ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना भ्रष्टाचार केल्याचा दावा अकोल्याचे पोलीस अधिकाऱ्याने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर हजारो कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. पोलीस अधिकाऱ्याने पोलीस महासंचालक संजय पांडे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्या रकमेची वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक केली. परमबीर सिंग यांच्या कुटुंबियांनी वेगवेगळ्या व्यवसायात त्या पैशांची गुंतवणूक केली, असा आरोप पत्रात करण्यात आलं आहे

Comments are closed.