Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कंगना रणौतला कोरोनाची लागण, अभिनेत्री स्वत: दिली माहिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

Get real time updates directly on you device, subscribe now.

मुंबई, 08 मे: बॉलिवूडमध्ये कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होऊ लागला आहे. अनेक दिग्दर्शक, अभिनेते कोरोनाशी झुंज देत आहे. दरम्यान अभिनेत्री कंगना रणौत देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्री कंगना रणौतने सोशल मीडिया वर याबाबत स्वत: माहिती दिली आहे.

सध्या ट्विटरपासून दूर असणाऱ्या कंगनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. तिने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, ‘गेल्या काही दिवसांपासून मला थकल्यासारखं आणि डोळ्यात जळजळ होण्यासह अशक्त वाटत होतं. हिमाचलला जाता येईल असं वाटत होतं म्हणून मी काल माझी चाचणी केली आणि आज मी कोव्हिड पॉझिटिव्ह आले आहे.’

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.