Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यातील दुकानांची वेळ वाढवून द्या: शिवसेना अहेरी तालुका अध्यक्ष सुभाष घुटे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

गडचिरोली जिल्यातील आदिवासी भागातील असंख्य लोकांना व लहान व्यवसाय करणाऱ्यांवर अन्याय होत असल्याबाबत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : अहेरी विधानसभा मध्ये पाच तालुके येत असून अहेरी ग्रामीण भागातील असंख्य लोकांना कोरोनामुळे या भागात दुकानाची वेळ सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. परंतु या भागांमध्ये अहेरी, आलापल्ली ही दोन मोठी गावे मध्य ठिकाणी असून आजूबाजूच्या गावातील आम जनता ही साहित्य खरेदी करण्याकरता १० वाजेपर्यंत पोहचतात आणि ११ वाजता दुकाने बंद होतात.

आता पावसाळ्याला सुरुवात होत असल्याने काही गावांचा सहा महिनेपर्यंत संपर्क होत नाही. त्यांना शेतीचे साहित्य खरेदी करावे लागते, पाच ते सहा महिन्याचे किराणा सामान घ्यावे लागते. ८ ते ११ वेळ असल्यामुळे ते साहित्य खरेदी करू शकत नाही. त्यांच्यावर मुक्काम करण्याची वेळ येत आहे. आणि या ठिकाणी त्यांना अकरानंतर पिण्याचे पाणी, नाश्ता जेवण मिळत नाही. त्यांना या ठिकाणी उपाशी झोपावे लागत आहे. अशी वेळ आमच्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी जनतेवर कोरोनामुळे आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या भागातील लहान दुकानदार हे दोन वर्षापासून कर्ज घेऊन आपला व्यवसाय करीत आहे. बँकेचे व्याज त्यांना भरावे लागत आहे. कोणाकडे तीन लाख कोणाकडे दोन लाख कर्ज त्यांच्या उरावर आहे. आणि बँके वाले जबरदस्तीने कर्ज वसुली करीत आहे. या लहान व्यापा-यांनी जगावं की मरावं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. त्यामुळे दुकानाची वेळ ही कमीत कमी ११ ते ३ पर्यंत करण्यात यावी. हि मागणी विधानसभेतील मतदार राजा लहान व्यापारी यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुकानांची वेळ वाढवुन देऊन दिलासा द्यावा अशी मागणी अहेरी तालुकाध्यक्ष सुभाष घुटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कापुर झाडाच्या वाइरल पोस्ट बद्दल एक सत्य पडताळणी

ऑनलाईन कविसंमेलनातून कोरोना लसिकरणाचा संदेश

 

Comments are closed.