Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज 11 कोरोनामुक्त तर 7 नवीन कोरोना बाधित

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 29 जुलै : आज जिल्हयात 7 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 11 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30586 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29782 वर पोहचली. तसेच सद्या 61 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 743 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.20 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला.

नवीन 7 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 03, अहेरी तालुक्यातील 00, आरमोरी 00, भामरागड तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 02, धानोरा तालुक्यातील 00, एटापल्ली तालुक्यातील 00, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 01, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 00, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 01, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 00 जणांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 11 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 00, अहेरी 01, आरमोरी 00, भामरागड 00, चामोर्शी 01, धानोरा 00, एटापल्ली 00, मुलचेरा 06, सिरोंचा 02, कोरची 00, कुरखेडा 01 तसेच वडसा येथील 00 जणांचा समावेश आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सुरजागड मार्गावर नक्षल्यांनी झाड पाडून मार्ग केला बंद; नक्षली पत्रके आढळली

कोलामार्का आरक्षित वनक्षेत्रातील वृक्षतोडीची होणार चौकशी; उपवनसंरक्षकांनी दिले आदेश

…या परिचारिकेने गमंत म्हणून काढला व्हीडीओ अन् हा व्हीडीओ समाज माध्यमावर झाला व्हायरल!

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.