पोलीस कोठडीतील आरोपी मृत्यू प्रकरण; ठाणेदारासह दोन पोलिसांवर गुन्हे दाखल
पोलिसांच्या बेदम मारहाणीमुळेच पोलीस कोठडीत आरोपीने केली आत्महत्या; अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस ठाण्यातील प्रकरण.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अमरावती, दि. १३ जानेवारी : अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस ठाण्यात २३ सप्टेंबर २०२१ रोजी बलात्कार व पोस्को गुन्हा दाखल झालेला आरोपी अरुण जवंजाळ (५०) यांनी पोलीस ठाण्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
या प्रकरणी सीआयडी कडे तपास देण्यात आला होता. दरम्यान यात पोलिसांच्या मारहाणीमुळे आरोपीने आत्महत्या केली होती. हा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला.
पोलिसांच्या मारहाणीमुळेच भयभीत होऊन आरोपीने पोलीस ठाण्यात आत्महत्या केल्याने यात वलगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार गोरखनाथ जाधव, पोलीस अमलदार रामकृष्ण चांगोले व सागर गोगटे या पोलीसा विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता पुढील कारवाईसाठी नागपूर येथील गुन्हे अन्वेषण विभाग यांच्याकडे देण्यात आला आहे.
हे देखील वाचा :
Comments are closed.