Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दर्शनी माल येथे समाज जागृतीपर प्रबोधन कार्यक्रम संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि. ८ एप्रिल : चामोर्शी तालुक्यातील दर्शनी माल येथे श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालित  फुले-आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय गडचिरोली तर्फे  राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत आयोजित विशेष श्रम संस्कार व ग्रामीण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात महा अंनिस शाखा गडचिरोली चे वतीने समाजातील वाईट चालीरिती, रुढी, परंपरा, अंंधश्रद्धा व विविध स्वरूपातील व्यसने यातून बाहेर काढण्यासाठी जनजागृती पर कार्यक्रम सादर करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राध्यापिका प्रज्ञा एस वनमाळी  तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महा अंनिस चे जेष्ठ कार्यकर्ते विलास निंबोरकर, जिल्हा कार्याध्यक्ष विठ्ठलराव कोठारे, जिल्हा प्रधान सचिव विलास पारखी, सदस्य उपेंद्र रोहनकर, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुधाकर वैरागडे , प्रा. हितेश चरडे, व प्रा  दिपक तायडे  आदी उपस्थित होते.

निंबोरकर यांनी उपस्थितांना साधु संत आणि महाराज यांच्या नावाने नकली लोक भगवे वस्त्र धारण करून समाजातील अशिक्षित अज्ञानी व  भोळ्या- भाबड्या लोकांना त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन फसवित असतात. थोडे फार हातचलाखी करून एखादा चमत्कार दाखवितात. आपण त्याची शहानिशा न करता श्रद्धेपोटी विश्वास ठेवतो आणि आपली शुद्ध फसवणूक करून घेतो हे टाळले पाहिजे व शिक्षणाचा उपयोग आपल्या जीवनात करून घेता आला पाहिजे तरच शिक्षण घेतल्याचे सार्थक होईल असे मोलाचे मार्गदर्शन केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

विलास पारखी यांनी सापाविषयी विस्तृत माहिती सांगून म्हणाले की, साप हा शेतकऱ्यांचा मीत्र आहे तर तो शत्रू कसा? शेतातील उंदरापासून होणाऱ्या हजारो रुपयांच्या मालमत्तेचे तो संरक्षण करीत असतो. उंदराची होणारी पैदास व त्याला लागणारे खाद्य याचा आपण विचार करीत नाही. शत्रुला मीत्र आणि मीत्राला शत्रू समजून मीत्राचीच कत्तल करून स्वताच्या पायावर धोंडा मारून घेत असतो. जवळपास २६५ ते २७० सापा पैकी केवळ पाचच साप विषारी आहेत त्यातल्या त्यात आपल्या कडे केवळ चारच विषारी साप मोठ्या प्रमाणात आढळतात. नाग, घोणस, मन्यार व फुरसे. यांना ओळखू शकलो तर उरलेले सर्व बीन विषारी असतात असे समजावे.

सापाविषयी असलेले समज गैरसमज सांगून पुढे म्हणाले की,  जर एखाद्या सापाने दंश केल्यानंतर तो विषारी होता की बिनविषारी हे निट समजले नसेल तर उगीच वेळ वाया न घालवता पेशंटला लवकरात लवकर वैद्यकीय उपचार कसा मिळेल याचा विचार करून ताबडतोब डॉक्टर पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केले तर आपण साप कितीही विषारी असू द्या त्याचे प्राण वाचवू शकतो. बऱ्याचदा मृत्युला कारणीभूत आपलेच अज्ञान असते. तेवढे टाळता आले तर आपण रुग्णाला शतप्रतिशत वाचवू शकतो असे मौलिक विचार मांडले.

कोठारे यांनी बुवा बाबा हातसफाई करून जे चमत्कार दाखवून सामान्य नागरिकांना फसवून त्यांच्या कडून आर्थिक लूट करण्यासाठी मानसिक दबाव निर्माण करतात. त्या चमत्कारी प्रयोगाचा पर्दाफाश करणारे विविध प्रात्यक्षिके साधुचा गणेश धारण करून, करून दाखवली व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. रोहनकर यांनी प्रास्ताविकपर मार्गदर्शनातून महा अंनिस ची भुमिका विषद केली.

कार्यक्रमाची सुरुवात ‘कोणी कितीही शिकला, साधा विज्ञान विसरला’ या गिताने करून,  सांगता ‘विज्ञान विज्ञान, दूर करा अज्ञान’ या घोष वाक्याने  करण्यात आली. संचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी साईली मुनघाटे तर आभारप्रदर्शन अंजली फुलझेले हीने मानले.

हे देखील वाचा : 

6 ते 16 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताह

२०११ च्या जनगणनेत नावे समाविष्ट नसलेल्या गरीब परिवारांनाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ द्या

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्काराकरीता अर्ज आमंत्रित

 

Comments are closed.