Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हनुमान चालीसा अन भोंग्यात अडकलेल्या राजकारण्यांना ही एकात्मता दिसणार का ?

बीडच्या कडा गावात हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतीक असणारा मौलवी बाबा यात्रा उत्सव.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
  • भगवी पांढरी पताका मिरवणूक; एक हनुमंताला तर दुसरी मौलाली बाबाला..
  • हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येऊन करतात यात्रा..

बीड, दि. १८ मे : राज्यातील राजकारणी हनुमान चालीसा अन भोंग्यात अडकून पडलेत. कुणी हनुमान चालीसाचे राजकारण करत आहेत तर कुणी भोंग्याचं राजकारण करतंय. यामुळं राज्यातील वातावरण ढवळून निघालंय. मात्र दुसरीकडे या सर्व गोष्टीला खतपाणी न घालता, बीडमधील गावखेड्यातील हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येत, अनोखा यात्रा उत्सव साजरा करत आहेत. गावातून भगवी अन पांढरी पताका मिरवणूक काढत, एक हनुमंताला तर दुसरी मौलवी बाबाला अर्पण करतायत. राज्यातील राजकारण्यांनी डोळ्यात झणझणीत अंजन घालावं, असं गावखेड्यातील चित्र आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा गाव असून या गावात जसं हनुमंताला पूजलं जातं, अगदी तसचं मौलवी बाबा दर्ग्याला देखील पूजले जाते. या गावात कोरोनाच्या 2 वर्षाच्या खंडानंतर यंदा मात्र, हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेचे प्रतिक असणारा, मौलाली बाबा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात सुरु झाला आहे. प्रथम गावातील ग्रामपंचायत समोरून मिरवणूकीला सुरुवात होते.

यावेळी एक भगवी पताका आणि दुसरी पांढरी पताका घेऊन, ही मिरवणूक काढली जाते. त्यानंतर भगवी पताका मारुती मंदिरात उभी करुन पुन्हा मिरवणूक सुरू होते. त्यांनतर मौलाली बाबा दर्ग्याला चादर चढवून पांढरी पतका उभी केली जाते. विशेष म्हणजे या मिरवणुकीत गावातील सर्व हिंदू- मुस्लिम बांधव एकत्र सहभागी होतात. आणि शेवटी सर्वांना गुळ, नारळ एकत्रीत करुण शेरणीचा महाप्रसाद वाटप करण्यात येतो.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

हमालाचा मुलगा बनला मर्चंट नेव्हीत ऑफिसर

भीषण दुर्घटना : मिठाच्या कारखान्याची भिंत कोसळून 12 ठार

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; राजीव गांधींच्या मारेकऱ्याची मुक्तता

 

Comments are closed.