Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कांकेर पोलिस-नक्षल फायरिंग :  2 पुरूष नक्षल्यांचा खात्मा

मोठ्या प्रमाणात  विस्फोटक साहित्य जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

कांकेर, 31 ऑक्टोबर :- कांकेर अंतर्गत येत असलेल्या सिकसोड क्षेत्रात  30 ऑक्टोबरच्य रात्री डीआरजी कांकेर आणि 81 वी वाहिनी, बीएसएफ यांच्या संयुक्त कारवाईत 2 पुरूष नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात विस्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे. या मृत दोन नक्षल्यांमध्ये डीव्हीसी दर्शन पद्दा परतापूर एरिया कमेटी सचिव आणि उत्तर बस्तर डिवीजन कमेटी सदस्य राहणार आमाकल, विकासखंड ओरछा जिल्हा नारायणपुर तथा उत्तर ब्यूरो एक्शन रेकी टीम कमांडर जागेश सलाम राहणार हिरणपाल थाना आमाबेडा जिल्हा कांकेरचा समावेश आहे. या दोन्ही नक्षल्यांवर सरकार द्वारा प्रत्येी 8 लाख रूपयांचे बक्षीस होते. याच्या विरोधात विविध ठाण्यात हत्या, लूट, जाळपोळ सारखे संगीन गुन्हे दर्ज आहेत.

डीआरजी कांकेर आणि 81 वी वाहिनी, बीएसएफ यांच्या संयुक्त टीम ला माओवादिंच्या विरूध्द सर्चिंग अभियानास सिकसोड क्षेत्राच्या कडमे, कठोरी, नवगेल, आलकन्हार साठी पाठविण्यात आले. सर्चिंगच्या दरम्यान 31 ऑक्टोबरच्या सकाळी 3 वा. सिकसोड पासून 20 किमी पश्चिमे कडील कडमे जंगल पहाडी क्षेत्रातून पोलिसांना अंधाधूंद फायरिंग करण्यात आली. यावेळी पोलीस जवानांनी आत्मरक्षार्थ नक्षल्यांच्या दिशेने फायरिंग केल्याने आणि पोलिसांचा वाढता दबाव पाहता नक्षली जंगलाचा फायदा घेउन पळून गेले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

फायरिंग नंतर पोलिस पार्टी द्वार घटनास्थळाची सर्चिंग केल्यावर तेथे 2 पुरूष नक्षल्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात विस्फोटक सामग्री जब्त केली.  जब्त केलेल्या सामग्रीत 315 बोर रायफल 1, 06 एमएम पिस्टल 1, 08 एमएम पिस्टलाचे जिवंत कारतूस 2, 315 बोर रायफल चे जिवंत कारतुर 1, 08 एमएम पिस्टल चे खाली खोके 1, वाॅकीटाकी सेट 1, पिठ्ठू 3, नक्षली गणवेश 4, रोख रक्कम 57,770 रूपए तसेच औषधी व अन्य साहित्यांचा समावेश आहे.

बस्तर रेंज चे पुलिस महानिरीक्षक सुन्दरराज पी, कांकेर रेंज चे पाुलिस उपमहानिरीक्षक बालाजी राव आणि कांकेर जिल्हा पोलीस अधीक्षक शलभ सिन्हा यांनी अभियानात समाविष्ट अधिकारी व जवानांचे अभिनंदन करून रोख बक्षिस घोषित केले आहे. डीआरजी टीम आणि बीएसएफ जवानांकडून आसपासच्या परिसराचे सर्चिंग शुरू आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

 

Comments are closed.