Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेतकर्यांनी अत्याधुनिक शेतीचे ज्ञान घेउन आपला विकास करावा – एसपी नीलोत्पल

भाजीपाला लागवड प्रशिक्षण व साहित्य वाटप मेळावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली,  01 नोव्हेंबर :- गडचिरोली जिल्ह्यातील शेतकर्यांनी अत्याधुनिक शेतीचे ज्ञान घेउन व दर्जेदार पध्दतीचा अवलंब करून, त्याबाबतची सर्व माहिती संकलीत करून आपला विकास करावा. यासाठी पोलीस दल सर्वतोपरी मदत करें असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले. आज 1 नोव्हेंबर रोजी भाजीपाला लागवड प्रशिक्षण व साहित्य वाटप मेळाव्याचे आयोजन पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य धाम येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ग

गडचिरोली पोलीस दल व केंद्र कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सोनापूर च्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रशिक्षण मेळाव्यास नक्षलग्रस्त क्षेत्रातील 300च्या वर शेतकरी सहभागी झाले होते. पुढे बोलतांना एसपी नीलोत्पल म्हणाले कि, गडचिरोली जिल्ह्यातील शेतकर्यांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने गडचिरोली पोलीस दादलोरा खिडकीच्या माध्यमातुन जिल्ह्यातील बेरोजगार युवक, युवती, शेतकर्यासांठी चालविलेल्या विविध उपक्रमाचा लाभ घेउन आपले जीवनमान उंचवावे तसेच नक्षलवाद्यांच्या खोट्या चळवळीला बळी न पडता गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने स्वतचा व जिल्ह्याचा विकास साधावा.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सुरू पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यातील 3554 युवक युवतींना विविध स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या मेळाव्याला पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे, केंद्रीय लिंबु वर्गीय फळ संशोधन केद्र नागपूर चे संचालक डॉ. दिलीप घोष, कृषि विज्ञान केंद्र गडचिरोलीचे कार्यक्रम समन्वयक संदीप कराळे, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आशुताष मुरकूटे, डॉ. नरेश मेश्राम उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी धनंजय पाटील व अंमलदारांनी परिश्रम घेतले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.