लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
विरार, 05 नोव्हेंबर :- शाळेच्या बसला आग लागण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी वसई हायवे वर अशाच एका शाळेच्या बसला अचानक आग लागली होती. सुदैवाने त्यात अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यात यश आले. आता विरार येथे एक शाळेची बस आगीत जळून खाक झाली. या घटनेत लाखाे रुपयांचे नुकसान झालेले आहे. पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहेत. दरम्यान ही घटना मध्यरात्री घडल्याची माहिती पाेलिसांनी दिली. मध्यरात्री ही घटना घडल्यामुळे जिवीतहानी झाली नाही.
विरार पूर्व येथील शंभर फुटी रस्त्यावर उभ्या असलेल्या एका शाळेच्या बसला अचानकपणे लागलेल्या आगीत बस संपुर्णत: जळून खाक झाली. ही घटना मध्यरात्री तीनच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती कळताच स्कूल बसचे मालक घटनास्थळी पाेहचले. ताेपर्यंत संपुर्ण बस जळून खाक झाली हाेती. या स्कूल बसच्या मालकांनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार नाेंदवली आहे. पाेलिसांनी अज्ञाता विराेधात गुन्हा दाखल केला आहे. पाेलिस या घटनेचा तपास करीत आहेत.
मात्र, एक गोष्ट यानिमित्ताने पुढे येत आहे की शाळेच्या बस गाडीचे मालक हे काळजीपूर्वक गाडीची देखभाल करत नाहीत. त्यामुळे हे गाडीला आग लागण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. याबाबत शाळा, पालक आणि बस गाडीचे मालक यांनी विध्यार्थ्यांच्या जीविताची काळजी लक्षात घेवून गाडीच्या देखभालीबाबत सतर्क राहिले पाहिजे, तरच असे अपघात होण्याचे टळतील.
हे पण वाचा :-
Comments are closed.