Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यातील पोलिसांना आनंदाची बातमी, एक लाख घरं बांधून देण्याच नियोजन : गृहमंत्री

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

मुंबई डेस्क, दि. २८ नोव्हेंबर: महाविकास आघाडी सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. या निमित्ताने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील पोलिसांना आनंदाची बातमी दिली आहे. येत्या काळात पोलिसांसाठी एक लाख घरं बांधण्याची योजना लवकरात लवकर पूर्ण करु असं त्यांनी सांगितलं. सोबतच दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात शक्ती कायदा आणणार असून येत्या अधिवेशनात त्याचा मसुदा मांडला जाईल, असंही सांगितलं.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस दलात साडेबारा हजार जागा भरण्याचा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला, असं गृहमंत्री म्हणाले. “मराठा आरक्षणामुळे भरती प्रक्रिया रखडली. परंतु कोणत्याही समाजावर अन्याय न करता पोलीस भरती प्रक्रिया राबवू. यासाठी पहिल्या टप्प्यात साडेपाच हजार पदांची भरती करतोय. त्यानंतर भरतीचा दुसरा टप्पा राबवू” असं ते म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.