Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेतून सर्वागिण गाव विकासाची कास धरावी- डॉ. किशोर मानकर यांचे आव्हान

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चातगाव, 11 मार्च :-चातगाव – गडचिरोली वनविभागाअंतर्गत चातगाव परीक्षेत्रात वाघाचा प्रादुर्भाव असल्याने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत 17 गावांची निवड करण्यात आली आहे. त्यात चातगाव, सावरगाव, कुरखेडा, पांढरसडा, घोटेविहीर, कटेझरी, मोरडोंगरी, आंबेशिवणी, आंबेटोला, मुरुमबोडी, बोथेडा, मौशीचक, गिलगाव, देऊळगाव, गुजनवाडी, भुरानटोला, मौशीचक, या गावांचा समावेश आहे. अमिर्झा येथे सर्व समित्यांच्या अध्यक्ष/सचिवांची गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर , उपवनसंरक्षक मिलीश दत्त शर्मा , सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांचे प्रमुख उपस्थितीत सभा आयोजित करण्यात आली.

सदर सभेत श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत गावकऱ्यांच्या मदतीने सिंचन कामे, कुकुटपालन, दुग्ध व्यवसाय, कृषी यंत्रे, बदक वाटप चारा व्यवस्थापन ई. कामे करणेविषयी चर्चा करण्यात आली. मा. वनसंरक्षक साहेबांनी सदर योजनेचा लाभ घेऊन गावाचा पुर्णपणे विकास करण्यात यावा याबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता चातगाव वनपरीक्षेत्राचे वनपरीक्षेत्राधिकरी पडवे साहेब, तांबे, मोहुर्ले, सिध्दार्थ मेश्राम, संदिप आंबेडारे यांनी सहकार्य केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.