Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बिघडलेल्या वाहतुकीमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या दुर्गेश च्या कुटुबियांना विमा कंपनी ने दिले 1 कोटी 15 लाख…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली: 2021 नोव्हेंबर मध्ये पोलीस स्टेशन गडचिरोली समोर ट्रकने झालेल्या अपघातामध्ये दुर्गेश नंदनवार यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता त्याबाबत मोटार अपघात दावा प्राधिकरण, गडचिरोली यांचे न्यायालयात अर्जदारांनी डेकाटे यांच्या वतीने नुकसान भरपाईसाठी अर्ज दाखल केला होता. १४ डिसेंबर २०२४ रोजी माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन जिल्हा न्यायालय गडचिरोली येथे करण्यात आले होते.

दाव्याविषयी विमा कंपनी व अर्जदारामध्ये लोकन्यायालयात समझोता करण्यात आला. त्यानुसार विमा कंपनी ने अर्जदारांना नुकसान भरपाई रक्कम रुपये १ कोटी, पंधरा लक्ष, एवढी रक्कम यापूर्वी मोटार अपघात दाव्यात देण्यात आलेली नव्हती. अर्जदाराचे ४ वर्षाचे अज्ञान बालकास सदर रक्कमेपैकी ४०% तो सज्ञान होईपर्यंत मुदतठेव, मृताचे पत्नीस ३०% व मृताचे आई – वडिलास ३०% रक्कम देण्याचे ठरले. प्रकरण तडजोडीकरीता ज्या पॅनेलवर ठेवलेले होते त्याचे पॅनल प्रमुख माननीय श्री. पी. आर . सीत्रे, जिल्हा न्यायाधीश – १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, गडचिरोली व पॅनल सदस्य कु दीपा गावडे, सामाजिक कार्यकर्ती ह्या होत्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पॅनल क्रमांक १ मधील पॅनल प्रमुख माननीय श्री. पी. आर . सीत्रे, जिल्हा न्यायाधीश – १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, गडचिरोली आणि श्री वसंत बा. कुलकर्णी, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली आणि माननीय श्री. आर. आर. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण याचे हस्ते मृताचे वारसांना इन्शुरन्स कंपनी चे वतीने रक्कम रुपये १ कोटी, पंधरा लक्ष चा धनादेश प्रदान करण्यात आला. अर्जदाराचे वतीने एल बी डेकाटे आणि इन्शुरन्स कंपनी चे वतीने राजेश ठाकूर हे होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.