भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
कल्याण : भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते हेंमत परांजपे यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तीं कडून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
हेंमत परांजपे यांना दोन अज्ञात व्यक्तींनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच दगडाने देखील मारहाण केल्याची गंभार घटना कल्याण येथे घडलेली आहे. तर अज्ञात व्यक्तींकडून हेंमत परांजपे यांना मारहाण केल्याने ते मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर आता शहरातील भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले बघायला मिळत आहे.
हेमंत परांजपे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ पकडून हजर करा अन्यथा भाजपकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराच भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिला आहे. सदर घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून दहशत पसरविण्या-या आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे
आणखी हे वाचा,
सहाव्या हप्ता केव्हा मिळणार ?. लाडक्या बहिणीं’ना प्रतीक्षा !
पोर्ला वनपरिक्षेत्रातील बेलगावच्या डोंगरावर हत्तींचा कळप स्थिरावला !
Comments are closed.