सर्च रुग्णालयात विशेषज्ञ ओपीडीला उस्फूर्त प्रतिसाद: २६९ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी
सर्च रुग्णालयात विशेषज्ञ ओपीडीला उस्फूर्त प्रतिसाद: २६९ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली: धानोरा तालुक्यातील चातगाव स्थित ‘सर्च’ रुग्णालयात मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने जानेवारी महिन्याच्या पहिल्या शनिवारी पेन ब्लॉक शिबीर (वेदना व्यवस्थापन इंजेक्शन) व एंडोस्कोपी शिबीर घेण्यात आले. या शिबिरामध्ये मुंबई व नागपुर येथील विशेषज्ञ डॉक्टरांतर्फे मोफत आरोग्य तपासणी व प्रोसीजर करण्यात आले.
पेन ब्लॉक शिबिरामध्ये ७० रुग्णांची आरोग्य तपासणी करून १८ रुग्णांना वेदना निवारण इंजेक्शन देण्यात आले. तसेच एंडोस्कोपी शिबिरामध्ये ७७ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली व ४४ रुग्णांची एंडोस्कोपी व ०२ रुग्णांची कोलोनोस्कोपी करण्यात आली. दर महिन्याच्या दुसर्या बुधवारला नियोजित असलेल्या त्वचाविकार व मूत्रविकार ओपीडी दत्ता मेघे हॉस्पिटल सावंगी येथील विशेषज्ञ यांनी रुग्णांची आरोग्य तपासणी केली. या विशेषज्ञ ओपीडी मध्ये १३२ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी गरजू रुग्णांकरिता उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सर्च रुग्णालय विशेष आर्थिक सुविधा देत आहे. विशेषज्ञ ओपीडीमध्ये ईसीजी, एक्सरे व प्रयोगशाळा तपासणी तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांवर सवलत प्रदान करित आहे तसेच पेन ब्लॉक इंजेक्शन व एंडोस्कोपी प्रोसीजर मोफत दरात करण्यात येत आहे.
Comments are closed.