Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हुक्का तंबाखूची तस्करी उघड – ६.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक.

अहेरी पोलिसांची मोठी कारवाई..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी– अहेरी पोलिसांनी अवैध हुक्का तंबाखूच्या तस्करीवर मोठी कारवाई करत सुमारे ६ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एक आरोपी अटकेत घेतल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई गेल्या रात्री उशिरा वांगेपल्ली गावाजवळील गेर्रा चौक परिसरात करण्यात आली.

मुखबीराकडून मिळालेल्या माहितीवरून अहेरी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मारुती सेलेरीओ (MH33 A 4301) या वाहनाची झडती घेतली असता, पांढऱ्या प्लास्टिकच्या चुंगड्यांमध्ये ‘मजा १०८ हुक्का शिशा तंबाखू’चे ३६० डब्बे आढळले. प्रत्येकी ९३५ रुपयांच्या दराने हे डब्बे विक्रीसाठी वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले. एकूण किंमत ३,३६,६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच आरोपीच्या ताब्यातील मारुती सेलेरीओ वाहनाची अंदाजे किंमत ३ लाख रुपये असून, ते देखील जप्त करण्यात आले. यानुसार एकूण मुद्देमालाची किंमत ६,३६,६०० रुपये इतकी आहे.

या प्रकरणी पराग अरविंद रामटेके (वय ३९, रा. सुलेझरी, ता. नागभीड, जि. चंद्रपूर; सध्या रा. अहेरी) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गु.र.क्र. ११७/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, २७४, २७६ व २७७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या कारवाईत पोलीस नाईक फैयाक रजाक शेख यांनी फिर्याद दिली असून, पोलीस निरीक्षक स्वप्निल इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. सागर माने यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.