Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चक्क! गांजा पिकवण्यासाठी शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

उस्मानाबाद, दि. २० नोव्हेंबर : लोहारा तालुक्यात मोडत असलेल्या मार्डी या गावातील शेतकऱ्याने चक्क गांजा लागवडीची मागणी उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शेतकऱ्याचे नाव महेश कदम असून त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मी बिगर पाण्याची शेती करणारा शेतकरी आहे. निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी मला पाण्याची आवश्यकता आहे. म्हणून मी पोखरा योजनेतंर्गत अर्ज दाखल केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मात्र यासाठी स्वत: जवळचे पैसे भरा नंतर अनुदान मिळवा. असे सांगण्यात आले. सोयाबीनला अधिक दर होता म्हणून त्यामुळे मी सोयाबीन पिकाची निवड केली. आणि सोयाबीनही खूप पिकवल.पण, सोयाबीनचे उत्पन्न होताच दर घसरले. १२ हजार रुपये क्विंटल दर असलेले सोयाबीन ५ ते ६ हजार रुपयांपर्यंत आले.

त्यामुळे सर्व खर्च वजा जाता हाती काहीच उरले नाही. यातूनच शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत असून शासनाने सोयाबीनला प्रतिक्विंटल १० हजार रूपये दर द्यावा किंवा आम्हाला गांजा लागवडीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

धक्कादायक!! युवा शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून चक्क विषप्राशन करून केली आत्महत्या!

पर्यावरण वाचविण्यासाठी दोन युवकांचा पुढाकार; जनजागृती करण्यासाठी सायकलने प्रवास

आदिवासीबहुल नक्षलग्रस्त भामरागडातील दोन युवक होणार डॉक्टर ; डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे यांनी केला सत्कार

कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; तीन ठार, एक जखमी

 

 

 

Comments are closed.