Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

…. चक्क प्राचार्यानेच दिली प्राध्यापिकेला गोळ्या घालून मारण्याची धमकी, पिडीत प्राध्यापिकेचा आरोप

प्रतिष्ठित शिक्षण संस्था आणि शिक्षण महर्षी बाबासाहेब वासाडे यांच्या संस्थेतील सावळा गोंधळ चव्हाट्यावर; पीडितेला न्याय मिळण्याची आस!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पिडीत प्राध्यापिका महिलेने सांगितले कि, फोन करून बिहार, झारखंड येथील  विद्यार्थ्यांचा फोन नंबर माझ्याकडून मागितले व त्याच्याकडून रिव्हॉल्व्हर, कट्टा बोलवायचे आहे असे सांगून तुला मारण्यासाठी कट रचला जात असल्याची धमकी प्राचार्यांनी  दिली असल्याचे पिडीतेने सांगितले, सदर महाविद्यालयात परराज्यातील विद्यार्थ्यांच्या हातून शस्त्र बोलावले जात असल्याचा धक्कादायक आरोप या पिडीत महिला प्राध्यापिकेकडून करण्यात आला आहे . महाविद्यालयात काम करीत असताना संबंधित या दोन्ही हि  प्राचार्याकडून माझ्यावर सातत्याने टिप्पणी व अँसिड टाकून मारण्याची धमकी दिली जात असल्याचेही आरोप पिडीत प्राध्यापिकेने पत्रकार परिषदेत केले आहेत.

चंद्रपूर दि,.१७ ऑक्टोबर : जिल्ह्यातील नामांकित अशी बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (बीआयटी) अभियांत्रिकी महाविद्यालय सध्या वेगळ्याच  कारणाने चर्चेत आली आहे . त्याचं कारण तसचं आहे. विद्येचं ज्ञानमंदिर असलेल्या शिक्षण क्षेत्रातील चक्क प्राचार्यचं आपल्या संस्थेतील एका महिला प्राध्यापिकेला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देत असल्याने  गुंडगिरीची भाषा विद्येच्या दालनात शोभेसी  वाटत नसल्याने शिक्षण विभागात खळबळ माजली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पिडीत प्राध्यापिका महिलेनी काही दिवसांपूर्वी हा संपूर्ण प्रकार संस्था चालकासमोर सांगितला. मात्र, संस्थाचालकाने याकडे अक्ष्यम्य दुर्लक्ष केले. अखेर पिडीतेनी काही दिवसापूर्वी लेखी तक्रार बल्लारपूर पोलीस ठाण्यात नोदवीली मात्र,त्या ठिकाणी न्याय न मिळाल्याने पिडीतेनी याबाबत तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षांकडे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहेत.

या संपूर्ण प्रकरणाची आपबिती पीडित प्राध्यापिकेने शनिवार दि.१६ ऑक्टोंबर’ला पत्रकार परिषद घेऊन माध्यमांनासमोर सांगितली आहे. सोबतच एक धमकी दिल्याचा ऑडिओ क्लिप तिने माध्यमांसमोर दाखविला आहे. चौकशी अंती या संपूर्ण प्रकरणाचा उलघडा होईलच. मात्र, तत्पूर्वी संवेदनशीलता दाखवत संस्थाचालकांकडून दोन्ही प्राचार्यावर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, संस्थाचालकच असे गंभीर आरोप झालेल्या प्राचार्यांची पाठराखण करतात. तेव्हा न्यायाची आस तरी कशी लावावी. असा यक्षप्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पीडित प्राध्यापिका मागील सहा वर्षापासून संस्थेत कार्यरत असून त्या मायानिंग विभागाच्या प्रमुख आहे. पीडितेनी बीआयटी अभियांत्रिकीचे प्राचार्य रजनीकांत मिश्रा आणि पॉलिटे्निक’चे प्राचार्य श्रीकांत गोजे यांच्यावर विविध आरोप पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच लावले आहेत. याबाबत संस्थाचालकांकडे विचारणा केली असता, हे आरोप बिनबुडाचे आहेत. सदर महिला खोटी बोलत असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहेत.

एखाद्या प्रतिष्ठित संस्थेत अश्या गंभीर घटना घडणे. हे सस्थेच्या प्रतिष्ठेसाठी बरे नव्हे. ज्याच्यावर विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी आहे. त्यांच्यावरच असे गंभीर आरोप, शिक्षणाच्या दालनात होत असेल. तर संस्थेत शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी याचा काय बोध घ्यावा. असा यक्षप्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. सध्या हे प्रकरण जिल्हाभरात चांगलेच चर्चिले जात असून, या प्रकरणाचा शेवट काय होईल. या करीता अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागेल इतकं मात्र, नक्कीच.

सबंधित महिलेचे आरोप बिनबुडाचे आहेत. महाविद्यालयात अशी कुठलीही घटना घडली नाही. महिलेने हे आरोप आकसापोटी केले आहेत.
संजय वासाडे,
कार्याध्यक्ष, बीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय बामणी, बल्लारपूर.

हे देखील वाचा,

तोंडावर स्प्रे मारून तरुणीचे अपहरण करुन पाच जणांनी केला सामूहिक अत्याचार

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून चार महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबाला अटक

वाघाने इसमावर हल्ला करून केले गंभीर, जंगलात बसून सिंधी तोडत असतांना घडली घटना.

Comments are closed.