Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पो. हवालदाराकडून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, आरोपीवर गुन्हा दाखल

 गडचिरोली पोलीस ठाणे हद्दीतील घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली :  एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस मुख्यालयात कार्यरत हवालदारावर बलात्कार व बाललैंगिक अत्याचार  कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

दि. २ डिसेंबरला  गडचिरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत  सदरची  घटना उघडकीस आलेली असून श्री. बंडू गेडाम, वय ५२ वर्ष  रा. नवेगाव ता. गडचिरोली असे त्या पोलिस हवालदाराचे नाव असून  तो पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे. एका अल्पवयीन मुलीने त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. पोलीस उपअधीक्षक अजय जगताप व  पो.नि. रेवचंद सिंगनजुडे यांच्यापुढे मुलीने सदरची आपबिती कथन केली. त्यानंतर सायंकाळी पो. हवालदार बंडू गेडामविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला. ज्यांच्यावर  महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे त्या  खाकी वर्दीतीलच कर्मचाऱ्यावरच लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाल्याने जिल्हा पोलिस दलात  एकच खळबळ उडाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.