Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भीषण अपघात! दुचाकीस्वाराची समोरासमोर धडक; धडकेत एक जागीच ठार तर तीनजण गंभीर जखमी

अहेरी तालुक्यातील आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर असलेल्या गोलाकर्जी गावाजवळील घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
जि. प.  अध्यक्ष अजय कंकडालवार हे शासकीय कामानिमित्य  सिरोंचाकडे जात असतांना त्यांना अपघात झाल्याचे कळताच लगेच रुग्णवाहिका बोलावून तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. यामुळे जखमींना वेळेवर रुग्णालयात पोहोचविण्यास मदत झाल्याने मोठे कौतुक होत आहे.   

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अहेरी, दि. २५ डिसेंबर :   आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर असलेल्या गोलाकर्जी गावाजवळ दोन दुचाकीस्वाराची समोरासमोर धडक  बसल्याने भीषण अपघात झाला असून  १ जागीच ठार तर ३ गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात येत असून सदर घटनेची नोंद पोलीस स्टेशन अहेरी येथे करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार आज दुपारच्या सुमारास अहेरी तालुक्यातील अर्कापल्ली येथील रहिवासी दिनेश आत्राम (२४) , रामसाई सोयाम (६५),  नागार्जुन आत्राम (१२) एम.एच. ३३ ए १५०६  या  दुचाकी वाहनाने आपल्या मुलाला  गुंडापल्ली वसतिगृहात पोहचवून देण्यासाठी जात होते. तर त्यांच्या विरुद्ध दिशेने एटापल्ली येथील रहिवासी अरुण तेलकुंटलावार हे वाहन क्र. एम.एच. ३३ ए  २३७० ने सिरोंचा कडे काही कामानिमित्य जात असतांना आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर असलेल्या गोलाकर्जी गावाजवळ दोन्ही दुचाकीस्वाराची समोरासमोर जोरदार धडक बसली.  दोन्ही दुचाकी वाहनाचे वेग जास्त असल्याने जोरदार धडक बसली.धडक इतकी जोरदार होती की या धडकेत अरुण तेलकुंटावार यांचा जागीच मृत्यू झाला. तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अपघातातील मृतक अरुण तेलकुंटावार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी व  अपघातात  झालेल्या गंभीर जखमींच्या उपचाराकरिता उप जिल्हा रुग्णालय अहेरी येथे दाखल करण्यात आले आहेत. सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन अहेरी येथे नोंद  करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

हे देखील वाचा  : 

टीईटी परीक्षा घोटाळा : आश्विन कुमारच्या घरातून २ किलो सोनं, २४ किलो चांदी जप्त; पोलिसांचा धडाका सुरुच

ओमिक्रॉनचा धोका; राज्यात रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी लागू, राज्य शासनाचे नवे निर्बंध

ओमिक्रॉनचा धोका वाढला, राज्यात नवे नियम, शाळांचं काय होणार? – आरोग्यमंत्री राजेश टोपे याचं सविस्तर स्पष्टीकरण

 

 

 

 

 

Comments are closed.