Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हेमंत ढोमेचा ‘सनी’ ने प्रदर्शनापूर्वीच तोडला रेकाॅर्ड

येत्या 18 नोव्हेंबरला होणार  प्रदर्शित

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 15 नोव्हेंबर :- हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण प्रदर्शना आधीच या चित्रपटाने एक रेकार्ड तोडलेय. मराठी चित्रपटसृष्टीत आता पर्यंत जे घडले नाही ते ‘सनी’ चित्रपटाने करून दाखविले आहे. मराठी सिनेसृष्टीत असे पहिल्यांदाच घडत आहे की, एखाद्या चित्रपटाचा शो त्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच थिएटरला लावला आहे आणि तो शो हाउसफुल झाला आहे.

नुकताच हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ या चित्रपटाचा पेड प्रिव्ह्यू शो पुण्यातील एका चित्रपटगृहात आयोजित करण्यात आला होता. या शोची तिकीट विक्री एका अॅपद्वारे प्रेक्षकांसाठी करण्यात आली होती आणि अवघ्या काही वेळातच हा शो हाउसफुल झाला. विशेष म्हणजे प्रेक्षकांचा मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता सनी च्या दुसर्या शोचेही यावेळी आयोजन करण्यात आले. ठाण्यातही पेड प्रिव्ह्यू शोचे आयोजन करण्यात आले असून तिथे ही ‘हाउसफुल’ चा बोर्ड लागला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘सनी’ला मिळालेले हे प्रेक्षकांचे प्रेम पाहून सनी बाॅक्स ऑफिसवर धमाका करणार हे नक्की !

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मराठी सिनेसृष्टीत आता अनेक नवनवीन प्रयोग होत आहेत. वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. प्रेक्षक ही या चित्रपटांना भरघोस पाठींबा देत आहेत. आता असाच एक भन्नाट विषय असणारा नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘झिम्मा’ चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर झिम्माची टीम प्रेक्षकांसाठी आता एक नवीन भेट घेउन आली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. सनीची भुमिका साकारणारा ललित प्रभाकर म्हणतो, माझ्यासाठी हा अनुभव सुखद आहे. सनी प्रेक्षकांना आवडतोय. जसे प्रेम प्रदर्शनापूर्वी दिले आहे तसेच प्रेम प्रदर्शनानंतरही द्याल याची खात्री आहे. घरापासून दूर जाणार्या प्रत्येक व्यक्तीची गोष्ट सांगणारा सनी चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षकांना तो कुठेतरी आपल्या जवळचा वाटतोय. ‘सनी’ हा चित्रपट येत्या 18 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. यात ललित प्रभाकर, चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग, अभिषेक देशमुख, अमेय बर्वे यांच्या प्रमुख भूमिका असून लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.