Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मनोज बाजपेयीची ‘The Family Man 2’ सीरीज लवकरच प्रदर्शित होणार!

बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी यांची वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन’ वर्ष 2019 मध्ये प्रदर्शित झाली होती. या वेब सीरीजला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क 04 मे:- बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी यांची वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन’ वर्ष 2019 मध्ये प्रदर्शित झाली होती. या वेब सीरीजला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. त्यानंतर या वेब सीरीजचा सीझन 2 प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर्षी जानेवारी महिन्यात चाहत्यांची प्रतीक्षा काहीशी कमी झाली होती आणि त्याचा टीझर देखील प्रदर्शित झाला होता. यानंतर प्रत्येकजण वेब या सीरीजची आतुरतेने वाट पाहत आहे. ‘तांडव’ सीरीजदरम्यान झालेल्या उलथापालथानंतर या वेब सीरीजचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. आता ही वेब सीरीज जून महिन्यात रिलीज होणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ही वेब सीरीज कधी प्रसिद्ध होणार आहे, याची घोषणा या वेब सीरीज निर्माते राज निधिमोरू आणि कृष्णा डीके यांनी केली आहे. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, आम्हाला माहित आहे की आपण ‘द फॅमिली मॅन’च्या नवीन हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहात. आम्ही तुमच्या प्रेमाबद्दल खूप आभारी आहोत. आमच्याकडे आपल्यासाठी एक नवी अपडेट आहे. ‘फॅमिली मॅन सीझन 2’ या उन्हाळ्यात अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. हा सीझन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही बरेच काम करत आहोत. आशा आहे की तुम्हाला हे खूप आवडेल.

द फॅमिली मॅन 2’ या जूनमध्ये रिलीज होणार आहे. मेकर्स राज आणि डीके यांच्यासह अ‍ॅमेझॉन प्राइम लवकरच या शोच्या अंतिम तारखेची घोषणा लवकरच करणार आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.