Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रणवीर सिंहच्या ‘सर्कस’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 मुंबई 3 डिसेंबर :-  बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा आगामी सर्कस चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. येत्या काही दिवसातच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मनोरंजनाने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन केले जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, आता नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत.

या ट्रेलरची सुरुवात 60 च्या दशकापासून होते. ज्यामध्ये रणवीर सिंह एक ‘इलेक्ट्रिक मॅन’ आहे म्हणजेच ज्याच्यामधून एक करंट जात असतो. या चित्रपटामध्ये रणवीर सिंहसोबत वरुण शर्मा दखील महत्वाच्या भूमिकेत आहे. ट्रेलरमध्ये चित्रपटातील सर्व कलाकारांची ओळख करताना दिसत आहे. तसच रणवीर सिंह आणि वरुण शर्मा हे दोघेही डबल रोल मध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे खूप चित्रपटात खूप गोंधळ झालेला देखील दिसेल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.