Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

छत्तीसगड मध्ये पोलीस व नक्षल चकमकीत एक नक्षली महिला ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

छत्तीसगड : बस्तर व सुकमा जिल्ह्याच्या सीमावरती भाग असलेल्या चांदामेटा व पयारभांट च्या जंगलात आज सकाळी झालेल्या माओवादी आणि बस्तर डीआरजी पोलीस यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत एका महिला नक्षलीला ठार मारण्यात बस्तर डीआरजी पोलिसांना  यश आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चकमकीनंतर शोधमोहीम राबविले असता नक्षल्यांचा मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला असून पोलिसांनी जप्त केला आहे. या शोधमोहिमे दरम्यान एके-47 रायफल, 2 पिस्तूल, 12 बोअर गन, 1 भरमार बंदूक आणि मोठ्या प्रमाणात माओवाद्यांचे साहित्य जप्त केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बस्तर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमावरती भागातील चांदमेटा, पटेलपारा, गडमेपारा, अंदलपारा, तुळशी डोंगरी,  पयारभांट आणि आसपासच्या भागात कांजर घाटी क्षेत्र समितीच्या अंतर्गत माओवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली. त्या मिळालेल्या माहितीच्या आधारे दि. १८ जून २०१२ रोजी जिल्हा बस्तर व दंतेवाडा जिल्हातील  नक्षलविरोधी पथक कारवाया करण्यासाठी डीआरजी टीम, जिल्हा पोलिस दल सुकमा, सीआरपीएफ ८० आणि २२७ वाहिनी नक्षल विरोधी अभियान राबविण्यासाठी सयुंक्त  रवाना करण्यात आली होती.

दरम्यान शोधमोहीम राबवित असतांना चांदामेटा व पयारभांट च्या जंगलात माओवाद्यांची चकमक उडाली. नक्षल्याने पोलिसांवर अंधाधुंद गोळीबार केला. पोलीस जवानांनीही प्रत्युत्तर देत जसाच तसे उत्तर दिले. जवळपास १ तास चाललेल्या चकमकीत एक नक्षल महिलेला ठार मारण्यात पोलिसांना मोठे यश आले असून मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा जप्त करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 

मान्सून पूर्व शोध व बचाव पथकामार्फत रंगीत तालीम

कोविड-19 साथरोगसंदर्भाने नियमांचे पालन करावे अन्यथा दंडात्मक कारवाई होणार – जिल्हा प्रशासन गडचिरोली

आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर

 

Comments are closed.