Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आदिवासी एकता परिषद तर्फे घरपट्टी वाटपाचा कार्यक्रम सपन्न ..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वसई, १६, ऑगस्ट :- भारत देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली परंतु डोंगर दऱ्या – खोऱ्यात, पाड्यात राहणाऱ्या आदिवासी समाजाची जनता आजही विकासापासून वंचित राहीलेली आहेत . वसई तालुक्यामधे एका बाजूला शहराचा झपाट्याने विकास होत असताना पाड्यात राहणाऱ्या आदिवासी समाजाला आजही मुलभूत सुविधा पोहचत नाहीत. हे फार मोठे दुर्दैव आहे. यासाठी आदिवासी एकता परिषदचे काळूराम ( काका ) धोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली सतत आदिवासी समाजाच्या विकासासाठी आंदोलन करावे लागत आहेत. वसई तालुक्यातील आदिवासी समाजाच्या लोकांना घरपट्टी आकारण्यात यावी यासाठी आदिवासी एकता परिषद तर्फे मागील वर्षी वसई तालुका अध्यक्ष दत्ता सांबरे यांच्या नेतृत्वाखाली वसई – विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय विरार येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात होते. सदर मोर्चातील मागण्याची दखल घेऊन महानगर पालिका उपायुक्त  गवस यांनी सर्व प्रभाग समित्याना पत्रक काढून आदिवासी समाजाच्या लोकांना घरपट्या आकारण्याचे आदेश जारी केले होते, त्यानुसार वसई तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर घरपट्या आकारण्याचे काम चालू झाले आहे .
त्याचाच एक भाग म्हणून कोफराड बिरसा मुंडा आदिवासी पाडा ( जे.पी.नगर बोळींज , विरार पश्चिम ) येथील आदिवासी बांधवाना घरपट्टी आकारण्यात आल्या आहेत. सदर घरोपट्टी वाटप आदिवासी एकता परिषदचे दत्ता सांबरे , शशी सोनावणे , प्रकाश जाधव , कविता उमतोल , गणेश शेलार यांच्या हस्ते करण्यात आले . सदर कार्यक्रमाच्या वेळी आदिवासी एकता परिषदचे , दत्ता सांबरे , शशी सोनावणे , प्रकाश जाधव , कविता उमतोल , गणेश शेलार , सविता झिंबल , गिता गरेल , वैभव वझरे , दिनेश लाखात , लाडक्या पुजारी , एकनाथ जाधव युवा भारत संघटनेचे संजय कुंभार यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. यावेळी वसई तालुका कमिटीचे विलास परेड , गिता शेलार , संतोष घाटाळ , गणेश पवार , रमेश घाटाळ , राजू दोडे , दिनेश सुर्वे तसेच पाडा कमिटीचे , गणेश शेलार , दिपक भिलाडे , राजेश खाचे , सविता झिंबल , संजय वाघ , अशोक चव्हाण , अनिल बाळशी , रजनी जाधव , सुमन राऊत , कविता शनवार , मिना शिरोदे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना व सुत्रसंचालन तालुका सचिव प्रकाश जाधव यांनी केले. पाड्यातील आदिवासी बांधवाना घरपट्टी आकारण्यात आल्यामुळे आनंदाच्या वातावरणात सदर कार्यक्रम पार पडला .

हे देखील वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अन्नातून विषबाधा का साप चावल्याने मृत्यू ? , कनेर भोयपाड्यात दोन मुलांचा मृत्यू, तीन मुले अत्यवस्थ.. विरार पूर्वेकडील कनेर भोयपाडा येथील हृदयद्रावक घटना..

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

माझ्या आयुष्यात पहिलेला सर्वात मोठा स्वयंस्फुर्त अभिनव स्वातंत्र्योत्सव – अमृता फडणवी

Comments are closed.