Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अन्नातून विषबाधा का साप चावल्याने मृत्यू ? , कनेर भोयपाड्यात दोन मुलांचा मृत्यू, तीन मुले अत्यवस्थ.. विरार पूर्वेकडील कनेर भोयपाडा येथील हृदयद्रावक घटना..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

विरार, १६, ऑगस्ट :- विरार पूर्वेकडील कनेर भोयपाडा येथील एका कुटुंबातील अन्नातून विषबाधा होऊन ५ मुलांपैकी २मुलांचा मृत्यू झाला असून ३ मुले अत्यवस्थ असून त्यांच्यावर विरारच्या पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विरार पूर्वेकडील कनेर भोयपाडा येथे असफाक खान आपली पत्नी व ५ मुलांसह राहत आहेत. १४ ऑगस्टच्या रात्री मुलांनी जेवण केल्यावर त्यातील फरीद असफाक खान या ९ वर्षाच्या मुलीला उलटी झाली, त्यानंतर दुसरा मुलगा अर्षद असफाक खान वय वर्षे ८ यालाही उलटी झाली. या मुलांवर घरगुती उपचार करण्यात आले पण गुण आला नाही. सकाळी या पाचही मुलांना त्रास होऊ लागला. यांना डॉक्टरकडे नेण्यात आले. पण तत्पूर्वीच फरीद असफाक खान ही मृत्यू पावली. त्यानंतर त्यांना महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर अर्षद असफाक खान या मुलाचा मृत्यू झाला. इतर तीन मुलाना पालिकेच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्यांचेवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मांडवी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनेची माहिती कळताच आमदार राजेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी असे सांगितले की ही आपत्कालीन घटना असून पोस्ट मार्टमचा रिपोर्ट अजून यायचा आहे त्यामुळे हे मृत्यू अन्न विषबाधेमुळे झाले का मणेर जातीचा साप चावल्याने झाले हे निष्पन्न होईल, शासन स्तरावर या कुटुंबाला मदत करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

माझ्या आयुष्यात पहिलेला सर्वात मोठा स्वयंस्फुर्त अभिनव स्वातंत्र्योत्सव – अमृता फडणवी

Comments are closed.