Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज 17 कोरोना बाधित तर 16 कोरोनामुक्त..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि.16, ऑगस्ट :- आज गडचिरोली जिल्हयात 285 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 17 असून कोरोनामुक्ताची संख्या 16 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37986 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 37129 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 80 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 777 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.74 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.21 टक्के तर मृत्यू दर 2.05 टक्के झाला आहे.
आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 05, चामोर्शी तालुक्यातील 04, कोरची तालुक्यातील 04 व कुरखेडा तालुक्यातील 04 जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील 04, चामोर्शी तालुक्यातील 05, व धानोरा तालुक्यातील 07, जणाचा समावेश आहे.

हे देखील वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

माझ्या आयुष्यात पहिलेला सर्वात मोठा स्वयंस्फुर्त अभिनव स्वातंत्र्योत्सव – अमृता फडणवी

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ग्रा.प.बोरी येथील जि.प. शाळेत नवीन वर्ग खोलीच्या उदघाटन सम्पन्न..

Comments are closed.