अनिल परब यांना अटकपूर्व जामिन मंजूर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, 09 नोव्हेंबर :- माजी मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना दापोली रिसाॅर्ट प्रकरणी न्यायालयाने अटकपूर्व जामिन मंजूर केल्याने दिलासा मिळला आहे. दापोलीच्या साई रिसाॅर्टमधील कथित घोटाळ्यात परब यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करत परबांना हा रिसाॅर्ट बांधल्याचा आरोप आहे. त्यामुळे परब यांच्यासह तिघांविरोधात कलम 34 आणि 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दापोलीच्या गटविकास अधिकारी यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अनिल परब यांच्यावर फसवणूक आणि आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मंत्रिपदाचा दुरूपयोग करत शेतजमीनीवर तीन मजली रिसाॅट बांधल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. शेतजमीनीचे बिगर शेती जमीनीत रूपांतर केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परब यांनी कदम यांना हे रिसाॅर्ट विकल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.
हे पण वाचा :-
Comments are closed.