Get real time updates directly on you device, subscribe now.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 21 सप्टेंबर : दारू व तंबाखूचे दुष्परिणाम लोकांना कळावे यासाठी गणेशोत्सवानिमीत्त मुक्तिपथ तर्फे भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील विविध गणेश मंडळांमध्ये बॅनर लावून जनजागृती करण्यात आली.
भामरागड तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या मल्लम्पोदूर, कुक्कमेटा, लाहेरी, ताडगाव, भामरागड शहर, कोयनगुडा, आरेवाडा, मंनेराजराम आदी गावांतील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी मुक्तिपथ कार्यकर्त्यांनी चर्चा करून दारू व तंबाखूचे दुष्परिणाम पटवून दिले. सोबतच व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. हा उपक्रम जिल्हाभरात राबविला जात आहे. मुक्तिथ अभियाना अंतर्गत विविध प्रमुख गणेश मंडळाच्या ठिकाणी बॅनर लावून दारू व तंबाखूच्या दुष्परिणामांची माहितीतून जागृती करण्यात येत आहे. ‘ज्या तोंडाने गणपतीचे नाव घ्यावे, त्याच तोंडात दारू व खर्रा टाकावे का ?, माझ्या दारात दारू नको, खर्रा नको अशा अशा आशयाचे बॅनर लावून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधले जात आहे. यासाठी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून उत्तम असे सहकार्य लाभत आहे.
Comments are closed.