२० फेब्रुवारीला सर्च रुग्णालयात कर्करोग व मधुमेह विकार आरोग्य तपासणी शिबीर ; मोफत इंसुलिन व औषधोपचार
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
खूप तहान लागणे, नेहमीपेक्षा जास्त वेळा लघवी होणे, विशेषतः रात्रीच्या वेळी जास्त थकवा जाणवणे, प्रयत्न न करताही वजन कमी होणे, सारखे काही इन्फेक्शन होणे, दृष्टी कमी होणे, कापलेल्या किंवा इतर जखमा लवकर न भरणे ही मधुमेहाच्या आजाराची लक्षणे आहेत. ज्या रुग्णांची रक्तातील साखर(शुगर) वाढलेली आहे. अशी लक्षणे आढळल्यास मधुमेह आजार ओपीडी मध्ये मधुमेह विकारतज्ञ डॉ. संकेत पेंडसे नागपुर तपासणी करतील.येताना आपले जुने रिपोर्ट्स आणावे व शुगर तपासणीसाठी उपाशीपोटी यावे. मधुमेह आजाराच्या रुग्णांना मोफत इंसुलिन व औषधी देण्यात येईल.


Comments are closed.