चंद्रपूर नंतर वर्ध्यातही हटावी दारूबंदी – काँग्रेसचे नेते शेखर शेंडे यांची मागणी
दारूबंदी हे थोतांड आहे, हीच वास्तविकता आहे. दारूबंदी असतानाही अवैध दारू सुरूच, विषारी दारू देखील जिल्ह्यात असल्याची टीका काँग्रेसचे नेते शेखर शेंडे यांनी केली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वर्धा : चंद्रपूर जिल्ह्यात सहा वर्षांपूर्वी लावली गेलेली दारू बंदी हटविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, तर वर्ध्यात 46 वर्षांपासून असलेली दारू बंदी मात्र कायम आहे. वर्ध्यात दारूबंदी असतांनाही मोठ्या प्रमाणात दारू विक्री होते. दारूबंदी हा केवळ खोटा मुखवटा आहे ते थोतांड आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेश सचिव शेखर शेंडे यांनी केली आहे. वर्ध्यात देखील दारू खुली करावी अशी मागणी शेखर शेंडे यांनी केली आहे.
1975 मध्ये वर्ध्यात दारूबंदी करण्यात आली. तब्बल 46 वर्षांनंतरही वर्धा जिल्ह्यात पूर्णतः दारूबंदी यशस्वी होऊ शकली नाही. शेजारच्या जिल्ह्यातून दारू वर्धा जिल्ह्यात पोहचतच आहे. दारूबंदी असताना गावठी दारू ग्रामीण भागात विकली जात आहे. ही दारू विषारी असल्याचे प्रकरणे देखील समोर आले आहे. विषारी दारूने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याला विषारी दारूमुळे धोका आहे. अनेकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या गावठी व विषारी दारूला जिल्ह्यात दारूबंदी हटविणे हाच पर्याय आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील दारूबंदी हटवावी अशी मागणी काँग्रेसचे शेखर शेंडे यांनी केली आहे.
महात्मा गांधी हे अहिंसावादी होते, गांधींनी कधीही जिल्ह्यात दारू बंदी करा असे म्हटलेले नाही, वर्ध्यात दारू सर्रास विकली जाते, बनावट दारू विकली जात असल्याने शासनाचा मोठा महसूल बुडतो आहे. त्यामुळे येथील दारूबंदी हटविली पाहिजे असेच मत नागरिक व्यक्त करीत आहेत.
हे देखील वाचा :
Comments are closed.