Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अल्पवयीन मुलीस देहविक्रीच्या व्यवसाय करण्यास प्रवर्तक करणाऱ्या दोघांवर गुन्हा

हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील घटना आरोपीमध्ये एक माजी पोलीस कर्मचारी महिलेचा समावेश

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

हिंगोली, 6 एप्रिल :- हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील श्रीनगर भागातील एका घरावर पोलिसांनी छापा मारला येथे एका अल्पवयीन मुलीस वेश्या व्यवसाय करण्यास प्रवर्त करून घरात वेश्याव्यवसाय चालवत असल्याचेही समोर आले याप्रकरणी एका महिलेसह दोघांना ताब्यात घेऊन पोक्सो व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

शहरातील श्रीनगर कॉलनी एका महिलेच्या घरी कुकर्म चालवले जात असल्याची खबर पोलिसांना लागली शहर पोलिसांनी छापा मारला या छाप्यात एका अल्पवयीन मुलीस तिच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन देह विक्रीचा व्यवसाय करण्यास प्रवर्तक करत असल्याची घटना समोर आली.सदर महिलेने आपल्या घरात कुकर्म करण्यासाठी जागा देऊन वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचेही या छाप्यात समोर आले.याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राहुल महिपाळे यांनी तक्रार दिली या तक्रारीवरून दोघाविरुद्ध पोस्कोआणि पिटा ऑक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम करत आहेत. यामधील अल्पवयीन मुलीला बालसुधारक ग्रहात पाठविण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.