अरुणाचल प्रदेश मध्ये बचाव कार्य करीत असतांना प्यारा कमांडो शाहिद.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
वाशीम, 18 एप्रिल : भारतीय सैन्य दलात प्याराशूट कमांडो म्हणून कार्यरत असलेले वाशीम जिल्ह्यातील सोनखास येथील जवान अमोल गोरे हे भारत चिन सीमेवर अरुणाचल प्रदेश येथे बचाव कार्य करीत असतांना शाहिद झाले आहेत. उद्या 19 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता वाशीम जिल्ह्यातील सोनखास या त्यांच्या मुळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, शहीद जवान अमोल गोरे हे देशसेवेसाठी सैन्यदलात दाखल झाले होते व प्यारा कमांडो म्हणून कार्यरत होते. याआधी झालेल्या अनेक महत्वपूर्ण अभियानात त्यांनी सहभाग घेऊन देशसेवा केली होती. 24 एप्रिलला ते सुट्टी घेऊन गावी येणार होते. मात्र त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडली आहे. अमोल यांना अवघा 4 वर्षाचा चिमुकला मुलगा असून मागे पत्नी, आई-वडील, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे. अमोल सारख्या धाडसी व मनमिळावू जवानाच्या शाहिद होण्याने वाशीम जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :-
Comments are closed.