Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्वारगेट बस स्थानकात महिलेवरील अत्याचारप्रकरणी कोणीही दोषी असो, त्याला सोडलं जाणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पुणे : पुण्यात स्वारगेट इथल्या एसटी स्थानकात २६ तारखेला शिवशाही बसमध्ये पहाटे २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याचा शोध सुरु आहे. याचा शोध १३ पथकं पुणे जिल्ह्याबाहेरही पाठवण्यात आली आहेत, अशी माहिती पुणे पोलीस उपायुक्त स्मातना पाटील यांनी दिली आहे. त्याचबरोबर आरोपीला पकडणाऱ्या व्यक्तीला १ लाख रुपयांचं बक्षीस ही पोलिसांकडून जाहीर करण्यात आलं आहे .
या बसस्थानकावर कार्यरत असलेल्या सर्व २३ सुरक्षा रक्षकांचं तात्काळ निलंबन करण्यात आलं आहे. येत्या ७ दिवसात या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या. स्वारगेट इथले सहाय्यक परिवहन अधीक्षक आणि बस डेपो व्यवस्थापक यांच्या विरोधात विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीत दोषी आढळल्यास त्यांना निलंबित करण्याचे निर्देश परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत. तसंच स्वारगेट बस डेपोवर नियुक्त केलेल्या सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन सुरक्षा कर्मचारी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याचा सरकारचा प्रयत्न राहील, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुण्यात स्वारगेट एसटी आगारात झालेल्या महिला अत्याचारप्रकरणी पोलीस प्रशासनानं तातडीनं पावलं उचलली आहेत, असं ते म्हणाले. तसंच त्यांनी बस आगारातल्या बंद पडलेल्या एसटी बसेस तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही या प्रकरणाचा आढावा घेतला. या प्रकरणात स्वारगेट बस आगारातल्या सुरक्षा रक्षकांच्या दुर्लक्षतेमुळे ही घटना घडल्याचं ते म्हणाले. तसंच स्वारगेट बस स्थानकाच्या सुरक्षेसाठी, आधुनिक सीसीटीव्ही बसवण्यात येणार असून, यासाठी ४३७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.