Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सात कलमी कार्यक्रमांतर्गत विविध दाखल्यांचे वाटप

मुल तालुक्यातील चिरोली येथे विशेष शिबिर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर : राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्याअंतर्गत सात कलमी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. या अंतर्गत मूल तालुक्यातील चारोली येथे विशेष शिबिरादरम्यान नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी मूलचे उपविभागीय अधिकारी अजय चरडे, तहसिलदार मृदुला मोरे, गटविकास अधिकारी श्री. राठोड, नायब तहसिलदार ओंकार ठाकरे, महिला व बालकल्याण अधिकारी निलेश चव्हाण, निरीक्षण अधिकारी राजेश शिरभाते यांच्यासह सरपंच आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यावेळी विविध दाखले, प्रमाणपत्र, रेशनकार्ड इत्यादी वितरीत करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विशेष शिबिरात संजय गांधी निराधार योजना, पुरवठा विभागाअंतर्गत रेशनकार्ड, अग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी निर्माण करणे तसेच कृषि विभागाच्या विविध योजना, पंचायत विभागाच्या योजना, महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजना बाबत माहिती देवून मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात आली, तसेच गावातील लोकांच्या समस्या जाणून घेऊन तात्काळ निकाली काढण्यात आले.

100 दिवस विशेष शिबिरात करण्यात आलेले वाटप : 1) सातबारा वाटप – 45, 2) नमुना 8 अ वाटप-24, 3) उत्पन्न दाखला -14, 4) ऍग्री स्टॅक नोंदणी – 139, 6) संजय गांधी निराधार अर्ज – 02, 7) श्रावण बाळ निराधार अर्ज – 04, 8) बि.पी. एल. दाखले -03.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.