Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

टेकडा ताल्ला येथील भव्य टेनिस बॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन

जय भीम क्रिकेट क्लब कडून भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

सिरोंचा, 3 एप्रिल :-सिरोंचा तालुक्यातील टेकडा ताल्ला येथे जय भीम क्रिकेट क्लब कडून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उदघाटन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.

या उदघाटन सोहळ्याला सहउदघाटक म्हणून आविस सिरोंचा तालुकाध्यक्ष बानय्या जनगम, तर अध्यक्ष म्हणून जाफ्राबाद सरपंचा सौ.निर्मला कुळमेथे तर प्रमुख पाहुणे माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके, व्यंकटापूर सरपंच अजय आत्राम,गरकापेठा सरपंच सूरज गावडे, मादाराम सरपंच दिवाकर कोरेत, मादाराम माजी सरपंच इरपा मडावी, जाफ्राबाद ग्राप सदस्य बिचमय्याजी कुडमेथे, आविस सिरोंचा शहराध्यक्ष रवी सुलतान, आविस सल्लागार विजय रेपालवार, आविस सल्लागार साई मंदा, जाफ्राबाद ग्राप सदस्य महेंद्र दुर्गम, ग्राप सदस्य शंकर घोडाम, माजी उपसरपंच तिरुपती दुर्गम, आविस सल्लागार वाईल तिरुपती, आविस सल्लागार राजन्ना दुर्गम, व्यंकटापूर माजी उपसरपंच व्यंकटी कारसपल्ली, आलापल्ली माजी सरपंच विजय कुसनाके, जुलेख शेख, आविस सल्लागार दुर्गेश लंबडी, रवी दुर्गम, नागेश जाडी सह आविस व भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी उपस्थित खेळाडू व नागरिकांना टेनिस बॉल खेळाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या कडून तर द्वितीय पुरस्कार आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगम व तृतीय पुरस्कार आविस सल्लागार साई मंदा यांच्याकडून ठेवण्यात आले. टेकडा ताल्ला येथील जय भीम क्रिकेट क्लब कडून आयोजित टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे यशस्वीतेसाठी मदन कोंडागुर्ला, विजय दुर्गम, संजीव कारसपल्ली, विजय गोदारी, नवीन दुर्गम, राजकुमार डोंगरे, संतोष कारसपल्ली यांनी परिश्रम घेतले. उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिचमय्याजी कुळमेथे तर आभार महेंद्र दुर्गम यांनी मानले. या उदघाटनीय सोहळ्याला जाफ्राबाद, टेकडा ताल्ला सह परिसरातील आविस, भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.