Get real time updates directly on you device, subscribe now.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुंबई, 29 ऑगस्ट : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे आदिवासी अध्यासनकेंद्राचे उद्घाटन कार्यक्रम दि. ०१ सप्टेम्बर २०२३ रोजी.दु ०२:०० वाजता विद्यापीठ सभागृह येथे आयोजित केले आहे.सदर कार्यक्रम कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडणार असुन उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणुन आदिवासी अभ्यासक , इतिहास विभाग प्रमुख, केंद्रीय विद्यापीठ,हैद्राबादचे प्रा. भांग्या भुक्या राहणार असुन त्यांचे आधुनिक भारताचा इतिहास व विदर्भ प्रांतातील गोंड जमाती अध्ययना वर आधारित ‘द रूट ऑफ द पेरीफेरी’ पुस्तक प्रकाशित झालेले आहे. सदर उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणुन प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे व कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन उपस्थित राहणार आहेत.
गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या आदिवासींचे जीवन, संस्कृति व भाषा, त्यांच्या समस्या, विकास-योजना आणि त्यांची आदिवासींच्या भविष्याचे दृष्टीने फलश्रुति किती झाली व आणखी कशी होऊ शकेल या बाबतच्या संशोधनाला खूप वाव आहे. त्या दृष्टिकोनातून गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्राची स्थापना महत्वाची आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा
गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी जमातींच्या संदर्भात संशोधन आणि त्यावर आधारित विकास या संदर्भात संशोधन करणे, विकास तसेच विस्तार- कार्य करणे हे या केंद्राची मुख्य उद्धीष्टे आहेत. याशिवाय भारतातील आदिवासींचे जीवन आणि समस्यांवर हे केंद्र संशोधन कार्य करू शकेल. आदिवासींच्या जीवन, संस्कृति यांचा अभ्यास, त्यांचे संहितीकरण व जतन, त्यात झालेली सामाजिक सांस्कृतिक परिवर्तने त्यांचे परंपरागत नेतृत्व आणि आदिवासींचे शोषण व त्यातून उद्भवणारी नवीन आव्हाने इत्यादी गोष्टींचा अभ्यास या केंद्रामार्फत केला जाईल. संशोधनाच्या सोबतच विस्तार – सेवा आणि प्रबोधनाचेही कार्य या केंद्रामार्फत करण्यात येईल. आदिवासी अध्यासन केंद्राचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समन्वयक,आदिवासी अध्यासन केंद्र डॉ. वैभव मसराम यांनी केले आहे.
Comments are closed.