Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पावसामुळे पडलेल्या घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई जराते यांची मागणी

पावसामुळे अनेकांच्या घरांची पडझड झालेली असून आपदग्रस्तांचे प्रचंड नुकसान झालेले झाले

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 29 जुले – मागील आठवडा भरापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे अनेकांच्या घरांची पडझड झालेली असून आपदग्रस्तांचे प्रचंड नुकसान झालेले झाले. त्यामुळे तालुक्यातील सर्व पूरबाधीत गावांतील शेतीचे आणि घरांच्या पडझडीचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी शेतकरी कामगार पक्षांच्या महिला नेत्या जयश्रीताई जराते यांनी केली आहे.

सोमवारला मौजा गुरवळा, शिवनी, कृपळा, वाकडी या गावांना भेटी देवून पुरग्रस्त शेती आणि घरांच्या पडझडीची पाहणी केल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने गडचिरोलीच्या तहसिलदारांना लिहिलेल्या पत्रात जयश्रीताई जराते यांनी म्हटले आहे की, आज मौजा – गुरवळा येथे भेट दिलेली असता श्रीमती सावित्राबाई सिताराम तुनकलवार यांचे घर पडून २ बैल जखमी , ७ कोंबड्यांचा मृत्यू तर मुलगा हरबाजी तुनकलवार यांचे दुचाकी वाहनाची तुटफुट होवून नुकसान झाली. तर अजय मेश्राम, पुनाजी मनिराम भोयर, जोगेश्वर गोमाजी तुनकलवार यांचेही राहते घर पडून प्रचंड नुकसान झाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच मौजा – शिवनी येथील पंढरी विठ्ठल निकुरे, नारायण विठ्ठल निकुरे, नामदेव ॠषी निकुरे, निलकंठ पेंदाम यांचेसह अनेक शेतकऱ्यांची शेती व रोवणे मागील आठवडाभरापासून पाण्याखाली आलेले असतांनाही स्थानिक स्तरावर पंचनामे करण्यात आलेले नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्व पूरबाधीत गावांतील शेतीचे व घर पडझडीचे पंचनामे करण्यात येवून नुकसान भरपाई मिळण्यासाठी वरीष्ठ कार्यालयाकडे तातडीने अहवाल पाठवावे, अशी मागणीही जयश्रीताई जराते यांनी केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने अनेक मार्ग बंद असताना 99 टक्के उमेदवारांनी दिली पोलीस शिपाई पदासाठीची लेखी परिक्षा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.