Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची प्रचार तोफ थंडावली 1 डिसेंबर ला मतदान गुरुवारी मतगणना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

गडचिरोली, २९ नोव्हेंबर: महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा प्रचार आज रविवार २९ डिसेंबर संध्याकाळी ५ वाजता थांबला. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रत्येक उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्तानी शक्तिप्रदर्शन केल्याचे पहावयास मिळाले.
मागील आठ-दहा दिवसांपासून राजकीय पक्षांनी तसेच अपक्ष उमेदवारांनी मेळावे, संमेलने, सभा, बैठका, चर्चासत्रांच्या आयोजनाच्या माध्यमातून प्रचार केला. आज रविवार प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने ज्येष्ठ नेते निवडणूक प्रचारात दिसून आले. या निवडणुकीत प्रामुख्याने प्रत्यक्ष प्रचारापेक्षा सामाजिक माध्यमांद्वारे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते प्रचार करताना दिसून आले. महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन वर्षपूर्ती झाल्यानंतर ही पहिली थेट निवडणूक आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे तर महायुतीसाठी नागपूर पदवीधर विभागाचा गड राखणे हे आव्हान आहे. या मतदार संघाचा इतिहास पाहिल्यास येथे भाजप व मित्र पक्षाचाच उमेदवार विजयी झाला आहे. कोरोना विषाणू संक्रमणाच्या सावटात होत असलेल्या या निवडणुकीच्या बाबतीत प्रशासन सतर्क आहे. शासनाने जारी केलेल्या सूचना व दिशानिर्देशांचे काटेकोरपणे पालन होत असल्याचे प्रशासनाद्वारे सांगितले जात आहे. मंगळवार १ डिसेंबर रोजी होणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुमारे २ लाख ६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी ३२२ मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. या निवडणुकीत १९ उमेदवार त्यांचे भाग्य आजमावित आहेत. त्यात भाजप महायुतीचे संदीप जोशी, महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी, अपक्ष म्हणून अ‍ॅड. वीरेंद्र जयस्वाल, संजय नासरे, संगीता बढे, शरद जीवतोडे, अ‍ॅड. सुनिता पाटील, राजेंद्र चौधरी, राहुल वानखेडे, अतुल खोब्रागडे, अमित मेश्राम, प्रशांत डेकाटे, नितीन रोंघे, नितेश कहाडे, डॉ. प्रकाश रामटेके, प्रा. बबन तायवाडे, राजेंद्र भुतडा, मोहम्मद शाकीर, प्रा. विनोद राऊत या उमेदवारांचा समावेश आहे. प्रत्येक उमेदवार विजयाचा दावा करीत असून ३ डिसेंबर रोजी होणाया मतगणनेनंतर विजयाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.