Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ओबीसींनी मोठ्या संख्येने रस्ता रोको व जेल भरो आंदोलनात सहभागी व्हावे – खास. अशोक नेते यांचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  

गडचिरोली, दि. 25 जून : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसींवर अन्याय केलेला असून ओबीसींचे राजकीय आरक्षण संपविण्याचा डाव रचलेला आहे. या निष्क्रिय सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उद्या दि. 26 जून रोजी संपुर्ण महाराष्ट्र राज्यात ओबीसींच्या न्याय हक्कासाठी रस्ता रोको व जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या या आंदोलनात ओबीसी बांधवांनी प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले आहे. आज दि. 25 जून रोजी शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित नियोजन बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बैठकीला प्रामुख्याने भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, अनुसूचित जनजाती मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष डॉ भारत खटी, किसान मोर्चा चे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, जि.प. चे कृषी सभापती रमेश बारसागडे, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगीताताई भांडेकर, गडचिरोली च्या नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, जि.प. च्या समाजकल्याण सभापती रंजीताताई कोडाप, नप उपाध्यक्ष अनिल कुणघाडकर,  गडचिरोली चे तालुकाध्यक्ष रामरतन गोहणे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, तसेच भाजपचे जिल्हा, तालुका व शहराचे पदाधिकारी, नगर परिषदेचे सभापती, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी रस्ता रोको आंदोलनाची रूपरेषा, नेतृत्व, व नियोजनाच्या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

भाजपाच्या वतीने आणीबाणी काळात २१ महिने तुरुंगवास भोगलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार

बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीला अहमदाबाद पोलिसांनी केली अटक

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ED ची धाड…

 

Comments are closed.